सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार, दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालखी महोत्सवाचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी दिली.शिर्डी येथे रामनवमी उत्सवासाठी मुंबई महानगरासह वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, नाशिक, सूरत, पालघर, डहाणू, जव्हार आदी ठिकाणांहून पायी दिंड्या जात असतात. साईसेवा पालखी सेवा महोत्सवादरम्यान मंडप मुहूर्त, श्री साईबाबा मूर्ती स्थापना, आरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. पायी साईभक्तांच्या सेवेसाठी महेश अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, अरविंद चौधरी, रेखा अग्रवाल, राजकुमारी अग्रवाल, मंगला ओझा, सरला भुतडा, भगवानभाई पटेल, जगदीश पटेल, जयेश मालपाणी आदी परिश्रम घेत आहेत.हजारोंच्या संख्येने साईभक्त सहभागीपायी दिंड्यांमध्ये हजारोंच्या संख्येने साईभक्त असतात. त्यांची सेवा करण्यासाठी वावी व कसारा येथे साई पालखी सेवा संस्थान मुंबईकडून मागील २३ वर्षांपासून एक्युप्रेशर थेरपी उपचार, पाणी, सरबत, फळवाटप तसेच राहण्याची सोय केली जाते.
वावी येथे साई पालखी सेवा महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:45 AM
सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार, दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालखी महोत्सवाचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी दिली.
ठळक मुद्देसाईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन