लोहोणेर : धाराशिव साखर कारखाना संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने उत्पादित केलेल्या साखर व मोलॅसीसची जिल्हाधिकाºयांमार्फत विक्री प्रक्रिया सुरू केल्याने चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत पेमेंट १५ टक्के व्याजासह दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.गेल्या ४-५ महिन्यांपासून वसाकाला ऊस पुरवठा करूनही थकीत बिलाची रक्कम मिळावी म्हणून शेतकरी वसाकाचे उंबरठे झिजवत होते. परंतु वसाका भाडेकरू संस्था व कामगार यांच्यातील वादामुळे कामकाजात व्यत्यय येत गेला व ऊस बिलांना उशीर झाला. गेल्या २-३ दिवसात जवळपास ३९ कोटींची साखर व मोलॅसीस विक्री प्रक्रि या सुरू झाल्याने या रकमेतून सन २०१८-१९ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकºयांचे सुमारे १० कोटी ६३ लाख रु पये थकीत पेमेंट देण्यासाठी कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. वसाकाने उत्पादित केलेली साखर ३१.१० रु . किलोप्रमाणे तर मळी ७१०० रु पये मे. टन याप्रमाणे विक्र ी झाली आहे.सध्याची दुष्काळी स्थिती व लग्नसराई यामुळे शेतकºयांना पैशांची नितांत आवश्यकता आहे. थकीत उसाचे बिल मिळावे यासाठी पुरवठादार शेतकरी प्रतीक्षेत आहेत. कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यातील वादामुळे साखर विक्री प्रक्रि या ठप्प होती.साखर आयुक्त यांच्या निदर्शनानुसार जिल्हाधिकारी संजय मांढरे यांनी यात हस्तक्षेप करून शेतकºयांची देणी देण्यासाठी साखर विक्री करण्यास देवळ्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना सूचित केले होते. त्यानुसार मंडल अधिकारी रामसिंग परदेशी यांनी याप्रकरणी जलद प्रक्रि या राबवून साखर व मोलॅसीस विक्र ी करण्यात आली आहे. अंतिम बिलासाठी संघर्ष अटळऊस उत्पादकांचे चालू गळीत हंगामासाठी पुरवलेल्या उसाचे थकीत पेमेंट मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी दखल घेत सातत्याने साखर आयुक्तालयावर दबाव आणत धाराशिव संचलित वसाकावर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानुसार कार्यवाही करत साखर व मोलॅसीस विक्र ीतून एफआरपी व व्याजासह पैसे मिळणार असतील तरीही वसाका व्यवस्थापनाने घोषित केलेले ३७१ रुपये केव्हा मिळतील, याची शाश्वती नसल्यामुळे ऊस पुरवठादार शेतकºयांना पुन्हा एकदा फायनल ऊस बिलासाठी संघर्ष करावाच लागेल, असे ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, यशंवत पाटील, कुबेर जाधव यांनी म्हटले आहे.
वसाकाची साखर विक्री प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:12 PM
लोहोणेर : धाराशिव साखर कारखाना संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने उत्पादित केलेल्या साखर व मोलॅसीसची जिल्हाधिकाºयांमार्फत विक्री प्रक्रिया सुरू केल्याने चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत पेमेंट १५ टक्के व्याजासह दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची परवानगी : ऊस पुरवठा करणाºया शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट मिळणार