शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्ह्यात पेरण्यांना प्रारंभ

By admin | Published: June 29, 2017 1:03 AM

जोरण : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून, शेत मशागत व पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजोरण : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून, शेत मशागत व पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. परिसरात आसखेडा, मोराणे, उत्राणे, खामलोण, फोपीर, कोटबेल, गोराणे, द्याने, श्रीपूरवडे भागात वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण केल्या आहेत, तर काही ठिकाणी सुरू आहेत. मका, बाजरी, भुईमूग, मूग या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. डाळींब पिकावर तेल्या व मर रोगाने थैमान घातले आहे. मोसम परिसरात हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या त्याचा खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने अनेक बागांवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली आहे. मातीमोल भावाने विकले जाणारे कांदा पीक घेणे शेतकऱ्यांनी यंदा टाळले आहे. मका लावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यंदा पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. मका लागवडीकडे कल वाढल्याने यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरी पारंपरिक शेतीला कंटाळला आहे. कारण मजुरी, महागडे बियाणे, मजूरटंचाई यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे.