शेतीची मशागत पूर्ण करून ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. सुरूवातीचे दोन नक्षत्राच्या पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला होता. पावसासाठी प्रतीक्षा सुरू असतानाच, शनिवारी येवला तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात सोमवारी येवला मंडळात ४५ मिमी, नगरसूल मंडळात १० मिमी, अंदरसूल मंडळात १७ मिमी, सावरगाव मंडळात ८ मिमी, पाटोदा मंडळात ३ मिमी तर जळगाव नेऊर मंडळात १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पारेगाव, मुखेड, निमगाव मढ, बदापूर, चिचोंडी या परिसरातील नाले तुडुंब भरुन वाहीले. तर काही शेतात पाणीही साचले. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी लगोलग पेरणीला सुरु वात केली. येवला तालुक्यात पेरणी योग्य झालेल्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून काही भागातील शेतकºयांनी पेरणीला सुरु वात केली आहे. पावसाचे वेध घेऊन काही शेतकºयांनी धूळपेरणी आटोपली होती. ज्या शेतक-यांनी धूळ पेरणी साधली आहे, अशा श्ेतकºयांकडून आता पावसाने दडी मारु नये, अशी प्रार्थना केली जात आहे.
येवला तालुक्यात पेरण्यांची लगबग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 6:58 PM