सुरगाणा : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरिक्षक संदिप कोळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस ठाणे, नगरपंचायत यांची परवानगी घेणे आवश्यक असून गणेश मुर्ती हि शाडू मातीची असावी. उत्सवा दरम्यान गोंगाट, गर्दी करू नये. रक्तदान आदी आरोग्यवर्धक कार्यक्रमास प्राधान्य द्यावे. स्वेच्छेने दिलेल्या वर्गणीचा स्विकार करावा. वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये. आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये. सामुदायिक रितीने पाण्याची विसर्जनासाठी व्यवस्था करावी. मुर्तीची उंची घरगुती साठी दोन फुटाची तर सार्वजनिक मुर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक नसावी. मंडळाने स्वत: काळजी घ्यायची आहे. दिलेल्या नियमांचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था मोडली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. साध्या पद्धतीने विसर्जन करावे आदी सुचना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.गणेशोत्सव काळात तरी किमान बंद असलेले सर्व पथदीप सुरू करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी तहसिलदार विजय सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक संदिप कोळी, धर्मेंद्र पगारिया, दिनकर पिंगळे, अकिल पठाण, राजू पवार, बाळा परदेशी, प्रकाश वळवी, आझाद शेख, नितिन ब्राम्हणे, विजय कानडे, अबू मौलाना, आनंदा झिरवाळ, पंडीत घाटाळ आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात तरी पथदिप सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 11:03 PM
सुरगाणा : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरिक्षक संदिप कोळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्देसुरगाणा : शांतता कमिटीची बैठकीत पदाधिकाऱ्यांचे आवाहन