पंचवटीची लोकसंख्या मोठी असल्याने त्यात गावठाण भागाचा व झोपडपट्टीचा समावेश आहे. गेल्यावर्षी कोरोना कालावधीत प्रशासनाने मेरी येथे डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह वगळता केवळ प्राथमिक स्वरूपातील व्यवस्था करून कोरोना संसर्गित रुग्णांसाठी १५० बेडची व्यवस्था केली होती. पहिली कोरोना संसर्ग लाट आल्यानंतर तसेच आता नव्याने पुन्हा दुसरी लाट पसरत असली तरी प्रशासनाने ऑक्सिजन बेडची सुविधा केली नाही. तर खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर तेथे ऑक्सिजन बेडच्या नावाखाली रुग्णांची लूट होते. प्रशासनाने इंदिरा गांधी मायको रुग्णालयात ऑक्सिजनची सोय केली तर रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठीची धावपळ थांबेल. राज्यातील कोरोना आकडा लक्षात घेऊन प्रशासनाने मेरी कोविड सेंटर जास्त क्षमतेने सुरू करावे, पंचवटी विभागाची लोकसंख्या लक्षात घेऊन पंचवटीसाठी स्वतंत्र हजार बेडची व्यवस्था करावी, मनपा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे व चाचण्या वाढविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
पंचवटीत हजार खाटांचे कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:14 AM