खमताणे : भाव नसल्याने कसमादे परिसरात सडलेला कांदा फेकण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळेल व कर्जातून मुक्त होऊ या प्रतिकक्षेत असलेल्या कसमादे परिसरातील अनेक कांदा उत्पादक शेतक-यांच्या कांद्याला सध्या कवडीमोल मिळत भाव मिळत आहे. आता हा कांदा विक्र ीसाठी वाहन भरण्यासह बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्चही खिशातून भरण्याची वेळ आल्याने तालुक्यातील कांदा उत्पादकांनी मोठयÞा कष्टाने पिकविलेला कांदा मजुर लावून फेकण्यास सुरूवात केली आहे. गेल्या फेब्रुवारी -मार्चमध्ये तसेच त्या आधीपासूनच चाळीत साठवलेल्या कांद्याला आता तब्बल वर्ष झाले. सात ते आठ महिन्यात टिकणाºया कांद्याला आता चाळीतच पाणी सुटत आहे. बहुतांश चाळीत या कांद्याला कोंब फुटले आहे. या परिस्थितीत बाजार समितीत कांदा विक्र ीसाठी नेला तर त्याला मातीमोलच भाव मिळेल, याची जाणीव कांदा उत्पादक शेतकºयांना झाली आहे. यामुळे कांद्याची विल्हेवाट लावण्यासाठी शेतकरी आता कांदा चाळीबाहेर काढत आहे. काही शेतकर्यांनी कांदा उकिरड्यावर , तर काही मेंढपाळांना व मोकाट जनावरांपुढे टाकत आहे.
सडलेला कांदा फेकण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:51 PM