कसबे सुकेणे : राज्यातील परिवहन आणि रेल्वेसेवा सुरू झाली नसताना कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा तसेच मुंबई- पुणे व मुंबई-नाशिक चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार कर्मचाºयांना १५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. या निर्णयाला चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाने विरोध केला असून, राज्यभरामध्ये लॉकडाऊन देखील तेवढेच अनिवार्य असल्याने अद्याप वाहनव्यवस्था सुरळीत झालेली नाही, त्यामुळे कार्यालयात पोहोचण्याची व कोरोना संसर्गापासून बचावाची समस्यासुद्धा तितकीच भेडसावत आहे. कर्मचाºयांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एस. टी. बससेवा सुरू करावी. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये काही कक्ष आरक्षित ठेवण्यात यावेत, अशी मागणीही पठाण व सरचिटणीस प्रकाश बने यांनी केली आहे.------------------------चाकरमान्यांची गैरसोयपुणे आणि नाशिकमधून मुंबईला सरकारी नोकरी करणाºयांची संख्या मोठी आहे. या चाकरमान्यांना पुणे-मुंबई-पुणे आणि नाशिक-मुंबई-नाशिक अशी रेल्वेसेवा, त्याचप्रमाणे मुंबई व उपनगरातील लाइफलाइन असलेली लोकल रेल्वे, तसेच सर्व नगरपालिका परिवहन बससेवा सुरू करण्यात याव्यात, कर्मचाºयांच्या आरोग्याची हमी घेणे यादृष्टीने तातडीच्या वैद्यकीय उपचारांकरीता जवळच्या परीक्षेत्रांमध्ये शासकीय कर्मचाºयांसाठी स्वतंत्र राखीव कोविड रुग्णालय व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही महासंघाने केली आहे.--------------------शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यासाठी व कर्मचाºयांनी निर्धास्तपणे कर्तव्य बजावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करून दिलासा द्यावा.- भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना
मुंबईला जाणाऱ्या नाशिकच्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:43 PM