नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. प्राप्त लसींमध्ये ३२ हजार ७०० लसी या कोविशिल्डच्या असून, ९ हजार १०० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत.जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याच्या निर्धारित लसीकरणाच्या तुलनेत ९० टक्क्यांच्या आसपास लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठी या लसी दाखल झाल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने कोविशिल्डच्या लसींचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या टप्प्यात आलेली लस ही कोव्हॅक्सिनचीच आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा लस घेणाऱ्या व्यक्तींना त्याच कोविशिल्डच्या लसी दिल्या जाणार आहेत. मात्र, नवीन लस घेणाऱ्यांना कोव्हॅक्सिनच्या लसी देण्यात येत आहेत. लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस, विविध क्षेत्रांतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देणार आहेत.तालुकास्तरावर वितरणजिल्हा रुग्णालयातील लस साठवणूक दालनातील वॉक इन कुलरमध्ये सुमारे ५ डिग्री सेंटिग्रेडला या लसी मोठ्या बॉक्सेसमध्ये साठवून ठेवण्यात आल्या आहेत. त्या लसींचे तापमान कायमस्वरूपी २ ते ८ डिग्रीपर्यंत ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य केंद्रांमध्ये व्हॅनमधून नेतानाही त्या लसी आइसलँड रेफ्रीजरेटरमधून (आयएलआर) नेण्यात आल्या असून जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांपर्यंत त्या पोहोचविण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:37 AM