लोहोणेर : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या गळीत हंगामास रविवार,दि.११ रोजी आमदार डॉ. राहुल आहेर याच्या अध्यक्षतेखाली गव्हाणपूजनाने प्रारंभ झाला. सन २०१८-१९साठी गाळपास येणाº्या उसाला जिल्हयातील आसपासच्या इतर कारखान्यांपेक्षा १रूपयाका होईना पण जास्त भाव दिला जाईल तसेच चालू वर्षाच्या उसाच्या बिलाचा पहिला हप्ता किमानदोनहजाररूपये प्रती टन याप्रमाणे वाहन वजन झाल्यानंतर लगेचच धनादेशाने देण्यात येईल.उर्विरत फरकाची रक्कम इतर कारखान्यांच्या तुलनेप्रमाणे अदा केली जाईल असे प्रतिपादन वसाका चे अभिजित पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे,किरण बोधलेमहाराज पंढरपूर, डीव्हीपी ग्रुपचे भागवत चौघुले, रणजीत भोसले, सुरेश सावंत, संदीप खरे, दिलीप धोत्रे, अभिजित कदम, विकास काळे, संजय खरात आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना अभिजित पाटील म्हणाले कि, वसाका गत हंगामात ज्या ऊसउत्पादकांनी ऊस पुरवठा केला त्यांना एफआरपी प्रमाणे पेमेंट अदा करण्यात आले. यावेळी गळीत हंगामात सुमारे पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा मानस असून शेतकर्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेवून जास्त उत्पादन घेणार्या ऊस पिकाची लागवड करावी असे आवाहन केले.यावेळी बोलतांना आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले कि, वसाकाच्या दृष्टीने येणारा भविष्यकाळ हा उज्ज्वल असून वासाकाला लवकरच गतवैभव प्राप्त होईल. कसमादे पट्ट्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. वसाका व्यवस्थापनाने जास्तीत जास्त गाळप करून परिसरातील शेतकर्यांना न्याय द्यावा. यावेळी वसाकास ऊसपुरवठा करणार्या 11 सपत्नीक शेतकर्यांच्या हस्ते गव्हानपूजन करण्यात आले.एफआरपी प्रमाणे शेतकर्यांचे थकीत पेमेंट करून मगच मोळी टाकल्याने वसाका प्राधिकृत मंडळाने शेतकर्यांना दिलेला शब्द पाळला आहे. वसाका कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी इतर कारखान्याऐवजी वसाकाला ऊसपुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी अभिजित पाटील यांनी केले. यावेळी हभप किरण बोधले महाराज पंढरपूर यांनी उपस्थितांना उदबोधित केले.कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्र माचे प्रास्ताविक व स्वागत जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले.
वसाकाच्या गळीत हंगामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 6:14 PM
विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या गळीत हंगामास रविवार,दि.११ रोजी आमदार डॉ. राहुल आहेर याच्या अध्यक्षतेखाली गव्हाणपूजनाने प्रारंभ झाला. सन २०१८-१९साठी गाळपास येणाº्या उसाला जिल्हयातील आसपासच्या इतर कारखान्यांपेक्षा १रूपयाका होईना पण जास्त भाव दिला जाईल तसेच चालू वर्षाच्या उसाच्या बिलाचा पहिला हप्ता किमानदोनहजाररूपये प्रती टन याप्रमाणे वाहन वजन झाल्यानंतर लगेचच धनादेशाने देण्यात येईल.
ठळक मुद्देपहिला हप्ता दोन हजार रूपये प्रतीटऩ, धनादेशाने पेमेंट