देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी येथील श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आयोजित वारकरी महोत्सवास रविवारपासून (ता.३) सुरुवात झाली. श्री गोरक्षनाथांच्या महापूजेने या उत्सवाचा प्रारंभ झाला.महोत्सवात नवनाथ ग्रंथ व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण हे एकनाथ महाराज कोष्टी यांच्या नेतृत्वात सुरू असून, रोज दुपारी बंडा महाराज कराडकर हे श्रीमद्भागवत ग्रंथातील भरतगीता यावर प्रवचन देत आहेत. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हसेगावकर यांचे कीर्तन झाले. तात्कालिक प्रभाव, आत्यंतिक प्रभाव, भावनिक सौंदर्य, वस्तुनिष्ठ सौंदर्य यावर महाराजांनी सोप्या भाषेत चिंतन केले.दरम्यान श्रीगोरोबाकाका महाराज संस्थान तेर येथील २०० वारकरी विद्यार्थी हरिपाठासह कीर्तनाला साथ देत आहेत. कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने येथे होत असून सोमवारी बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन झाले.याशिवाय, रोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. महोत्सवात शनिवार, दि. ९ रोजी संतपूजन सोहळा होणार असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवृंद, पखवाजवादक, टाळकरी, वारकरी यांच्यासह भाविकांची मोठी उपस्थिती हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे. कार्यक्रमस्थळी भव्य मंडप व रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञान-भक्तीचा संगम आहे. समाजाला सन्मार्गावर आणण्याचे पवित्र कार्य या वारकरी महोत्सवातून होत आहे. येथे भाविकांच्या भक्तीचा मळा फुलला आहे. भाविकांनी या महोत्सवातील सर्वच कार्यक्र मांचा लाभ घ्यावा.- संजय धोंडगे,अध्यक्ष, निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर
वारकरी महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 1:08 AM
देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी येथील श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आयोजित वारकरी महोत्सवास रविवारपासून (ता.३) सुरुवात झाली. श्री गोरक्षनाथांच्या महापूजेने या उत्सवाचा प्रारंभ झाला.
ठळक मुद्देमकरंदवाडीत धर्मबीज उत्सव : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन