ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला आज अंबड येथील वेअर हाऊस मध्ये प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत मतदान झालेल्या मतपत्रिकांची सरमिसळ करून 50 मतपत्रिकांचा एक याप्रमाणे गठ्ठे करण्यात येत आहेत.
मतदान आणि उपलब्ध मतपत्रिका यांचा हिशेब पूर्ण झाल्यानंतर दुपारी मतपत्रिकांवरील पसंती मतदान तपासण्यास सुरुवात होईल. एकूण 30 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. सुमारे 850 कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. सायंकाळपर्यंत निकालाचा कल लक्षात येईल तर रात्री उशीरा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील आणि भाकपाचे प्रकाश देसले यांच्यासह 17 उमेदवार रिगणात आहेत.