सिडको : येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली असून, यात मनपाचे अधिकारी व कर्मचारीदेखील सामील असल्याचे बोलले जात आहे. जलकुंभातून किती पाणी टॅँकरमधून काढण्यात आले याबाबतचा कोणताही तपशील मनपाकडे नसून असाच प्रकार शहरातील इतर जलकुंभातूनही होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे मनपा कर्मचाऱ्यांच्या संगनमताने दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत असल्याने याकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.पवनगर भागात असलेल्या मनपाच्या जलकुंभातून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून महिनाभरातून ५० टॅँकरची रीतसर पावती घेत त्याची आगाऊ रक्कम भरून दररोज दिवसाढवळ्या हजारो लिटर पाणी चोरी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून होत असल्याची बाब शिवसेना नगरेसवक किरण गामणे यांनी उघडकीस आणली आहे. याबाबतचा जाब मनपा अधिकाºयांना विचारल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक यांचे राजकीय लागेबांधे असल्याने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कोणी करीत नसल्याचे समजते. विशेष म्हणजे संबंधित बांधकाम व्यावसायिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी कसे वापरतो? व मनपा अधिकारी, कर्मचारीदेखील याबाबत मौन बाळगत असल्याने याबाबात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरसेवक गामणे यांनी सिडकोतील प्रकार उघडकीस आणला असला तरी असाच प्रकार शहरातील इतर जलकुभांतूनही होत असल्याचा संशय यातून व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा अधिकाºयांंकडे याबाबतची संपूर्ण माहिती असणे गरजेचे असताना याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने यातून दररोज हजारो लिटर पाणी चोरी होत असल्याचे दिसून येत आहे.सिडको येथे मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे. येथील रहिवाशांना अनेकदा पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र दररोज हजारो लिटर पाण्याचा काळाबाजार होत असल्याने याबाबत मनपा आयुक्तांनी दखल घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.गामणे यांनी महासभेत उपस्थित केला प्रश्नसिडकोतील पवननगर जलकुंभातून बांधकामासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून पाणीचोरी केली जात असल्याबाबत महासभेत लक्षवेधी सूचना मांडली. सिडकोत काही नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे पाणीचोरी करणाºया बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणीही आयुक्तांकडे गामणे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:39 AM