दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील टीडीके इपकोस, अंबड औद्योगिक वसाहतीतील पांचाल इंजिनीअर्स यासह अन्य कारखान्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करीत कामगारांच्या निवासाची सोय करून आपले कारखाने पूर्ववत सुरू ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. यातील टीडीके इपकोस कंपनीने जवळपास ५०० कामगारांची कारखान्यात आणि अन्य ठिकाणी सोय केली आहे, तर पांचाल इंजिनीअर्स कंपनीने आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये १५ कामगारांची निवासाची सोय करून आपले निर्धारित उत्पादन काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
इन्फो==
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, सुमारे २५ टक्के कामगारांची निवासाची सोय करून कंपनी सुरू केली आहे. निवासाची सोय करताना कोणत्याही कामगारांवर जबरदस्ती केली नाही. ज्यांनी तयारी दाखविली, त्यांचीच निवासाची सोय केली आहे. कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच शक्य झाले आहे.
- निखिल पांचाल संचालक पांचाल इंजिनीअर्स अंबड.(फोटो १४ पांचाल)