इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३१ मधील मुरलीधर नगर परिसरात भूमिगत गटार मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता त्याची दखल घेत प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे व नगरसेवक संगीता जाधव यांनी तातडीने पाणीपुरवठ्याची पाइपलाइन भूमिगत गटारीपासून वेगळी करण्याची सूचना केल्याने महापालिकेने कामास सुरुवात केली आहे.मुरलीधरनगरमधील अथर्व कॉलनी परिसरातील ४० रो-हाउसमध्ये गेल्या चार दिवसांपासून भूमिगत गटारीचे मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाणीपुरवठ्यामुळे लहान बालकांना उलट्या व जुलाब सुरू झाले. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पिण्याचे पाणी सुद्धा भरणे अवघड झाले होते. त्यामुळे परिसरातील महिलांनी नगरसेवक संगीता जाधव व सुदाम डेमसे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामास सुरुवात केली.
दूषित पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी हटविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:23 AM