लासलगाव : कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी वैद्यकीय उपचार देत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी केले.कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांची निफाड च्या प्रांत डॉ.अर्चना पठारे यांनी बुधवारी भेट घेऊन त्यांचे समुपदेशन करून घबराट दूर केली. सदर रूग्णावर उपचार सुरू असुन त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच घरी पाठविले जाईल. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून लवकर बरे व्हाल अशा शुभेच्छा देत त्यांनी या सर्वांच्या मनातील भीती दूर करण्यात यश प्राप्त केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी वैद्यकीय सुविधा,औषधे पुरवून देखरेख केली. त्यामुळे बरे झाल्यानंतर देखील काही काळ चांगला आहार व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी देखील संवाद साधला. यावेळी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, मंडल निरीक्षक विजय आहेर, तलाठी शिर्के आदी उपस्थित होते.च्कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात असलेल्या १७ जणांना नाशिकच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले असून यापैकी नऊ रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या नऊ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यापैकी एकास होम कॉरण्टाइन तर उर्वरित आठ जणांना विशेष कोरोना देखरेख व उपचार कक्षात विशेष अॅम्बुलन्सने आणले आहे. पूर्वीचे नऊ व नवीन आलेल्या आठ अशा एकूण सतरा संशयितांची देखभाल,उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी दिली. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये कमी धोका असलेले दहा संशयित सापडले असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.करोनाबाधित रु ग्णासोबत नगर येथे गेलेल्या ९ व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एकाच ठिकाणी कॉरण्टाइन केलेले आहे. त्यांच्यावर महसूल,आरोग्य व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहेत. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी सांगितले.
संपर्कात आलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:18 AM
कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी वैद्यकीय उपचार देत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी केले.
ठळक मुद्देखबरदारीचा उपाय : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे समुपदेशन