शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:20 PM

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली़

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली़ पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील उदवा येथील रहिवासी निर्मला सांबरे या मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पैसे भरण्यासाठी सीबीएसच्या मुख्य शाखेत गेल्या होत्या़ याठिकाणी चोरट्यांनी त्यांची काळ्या रंगाची पर्स चोरून नेली़ या पर्समध्ये २५ हजार रुपयांची रोकड होती़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेस मारहाणचारित्र्याच्या संशयावरून पत्नीस मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना जुन्या नाशिकमधील कुंभारवाडा परिसरात मंगळवारी घडली़ स्मिता चव्हाण या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पती राकेश गणपत चव्हाण याने चारित्र्याच्या संशयावरून काठीने मारहाण केली़ तसेच चाकूने हातावर वार केले़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनगरला महिलेची आत्महत्याबेडरूममधील खिडकीच्या गजाला ओढणीने गळफास घेऊन चाळीस वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) नाशिकरोडच्या कॅनॉल रोडवरील गुरुदत्त कॉलनीत घडली़ सुनीता मंगलराव शेट्टी (रा. कृष्णवेणी बंगला) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़घरफोडीत दागिन्यांची चोरीबंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम व गृहोपयोगी वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीत घडली़ १७ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी कबीरनगरमधील उषा खरात यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, २० हजार रुपयांची रोकड, दहा हजार रुपयांचा एलसीडी, दोन हजार रुपयांची गॅस टाकी व शैक्षणिक कागदपत्रांची फाईल असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायगावरोडवरून दुचाकीची चोरीशिंदे गावाजवळील नायगावरोड परिसरातील रहिवासी कृष्णा प्रसाद राजाराम सिंग यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी नायगावरोडवरून चोरून नेली़

टॅग्स :Crimeगुन्हाRobberyदरोडा