शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

राज्यस्तरीय नेत्यांची लागण स्थानिक पदाधिकाऱ्यांना

By admin | Published: July 13, 2017 12:22 AM

शहर, जिल्हा कॉँग्रेसची अवस्था : पराभूत मनोवृत्तीचे गारुड मानगुटीवर कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हाध्यक्षाला वैयक्तिक कारणावरून थेट घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत मजल जाते तर शहराध्यक्षाला विचारणा न करताच आघाडीच्या प्रमुखांना आंदोलनाची स्वतंत्र चूल मांडावी लागते. ना जिल्हाध्यक्षांना काही विचारपूस, ना शहराध्यक्षाला त्याचे सोयरसुतक अशा अवस्थेत सध्या शहर, जिल्हा कॉँग्रेस मार्गक्रमण करीत असून, दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीला कॉँग्रेस कशाच्या बळावर सामोरे जाईल, याचीच चिंता पक्ष कार्यकर्त्यांना लागून आहे. केंद्र व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आजवर सर्वात मोठा पक्ष म्हणून गणल्या गेलेल्या कॉँग्रेसची अवस्था अगदीच गलितगात्र झाली आहे. केंद्रीय पातळीवरच पक्षातील नेत्यांमध्ये असलेला बेबनाव राज्यातील नेत्यांपर्यंत तर राज्यातील गटबाजी थेट जिल्हा व गावपातळीवर येऊन पोहोचल्याने पक्ष नजीकच्या काळात भरारी घेण्याची कोणतीही शाश्वती कार्यकर्त्यांना दिसत नाही. शेतकरी आंदोलन, वाढती महागाई, इंधनाची दरवाढ, वस्तू व सेवा करामुळे सामान्यांना पडणारा भुर्दंड, काश्मीरामधील अतिरेकी कारवाया, अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला, चीनची घुसखोरी यांसारखे डझनाहून अधिक प्रश्न राजकीय पातळीवर हाताशी घेऊन विद्यमान सरकारविरुद्ध रान पेटविण्याची संधी असताना जिल्हा, शहराचे नेतृत्व मात्र त्यासाठी पराभूत मनोवृत्तीतून बाहेर पडण्यास तयार नाही. कॉँग्रेसची वरपासून खालपर्यंत हीच अवस्था असल्यानेच की काय खासगी कारण का असेना एखाद्या व्यक्तीचे थेट जिल्हाध्यक्षांच्या मानेपर्यंत हात घालण्याचे धाडस होण्याचे कारणही बहुधा तेच असावे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना मारहाण व्हावी व पक्षाने त्याचा साधा निषेध करून संशयितावर कारवाई करण्याची मागणीही करू नये, ही बाब तर सामान्य कार्यकर्त्याचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे. जयंती, पुण्यतिथीपर्यंत पक्ष कार्य सीमितएकेकाळी कायम गजबजणारी कॉँग्रेस कमिटी आता फक्त राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासाठीच उघडली जाते. अन्यवेळी कॉँग्रेस कमिटीच्या आवारात मेनरोडवर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने उभी केली जातात. ना पक्षाच्या साप्ताहिक बैठका, ना नगरसेवकांचे शहराच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. पक्षाचा जो अध्यक्ष असेल त्याचा कॉँग्रेस कमिटीवर ताबा राहील असा जणू अलिखित नियमच झाला की काय म्हणून माजी अध्यक्षांसाठी कमिटीचे दरवाजेही कायमचेच बंद केले जातात की ते स्वत: बंद करून घेतात, याचा उलगडा कार्यकर्त्यांना होऊ शकलेला नाही. पक्षाचे पदाधिकारी फक्त पक्ष निरीक्षक वा प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांपुरतीच कार्यालयात हजेरी लावतात तर नावापुढे माजी नगरसेवक अशी उपाधी लागलेल्यांचा चेहरा पक्ष कार्यकर्त्यांच्या विस्मरणात गेला आहे.