रायगड जिल्ह्यातील पेण येथे तीन वर्षांच्या मुलीला अत्याचार करून ठार मारण्यात आले तर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याने एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून विनयभंग केला आहे. त्याच्या विरोधात पीडित तरुणीने गुन्हा दाखल करून चार दिवस झाले तरी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. अभाविप मालेगावकडून सटाणा नाका येथे राज्य सरकारचा निषेध करून नराधमांना दिशा कायद्यानुसार शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अभाविप मालेगाव जिल्हा सहसंयोजक कामेश गायकवाड, वसतिगृह प्रमुख शिवदास सूर्यवंशी, शहर सहमंत्री तन्वी वैद्य, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनील शेलार, अविनाश ठोरकर, दिशांत पैठणकर, दीपक उपाध्याय, नंदकिशोर अहिरे आदी कार्यकर्त्यांसह मालेगाव शहर संघटनमंत्री सचिन लांबूटे उपस्थित होते.
अभाविपकडून राज्य सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:16 AM