नाशिक : शासनातर्फे आदर्श शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रामधील, दोन विशेष, एक अपंग, एक स्काउट व गाइड शिक्षक यांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले आदर्शशिक्षिका पुरस्कार आठ शिक्षिकांना जाहीर झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. जळगाव नेऊर ( ता. येवला) येथील जिल्हा परिषद शाळेतील नानासाहेब वाल्मीक कुºहाडे यांना प्राथमिक विभागात, तर आसखेडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील जयवंत निंबाजी ठाकरे यांची माध्यमिक विभागातून निवड झाली आहे. आदिवासी शिक्षक विभागामध्ये शिंदेवाडी ( ता. इगतपुरी) येथील विद्या रवींद्र पाटील, वेळुंजे (ता. त्र्यंबकेश्वर) नामदेव लक्ष्मण बेलदार, तर दिव्यांग शिक्षक म्हणून निफाड येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील नीलेश विनायक शिंदे हे पुरस्कारार्थी आहेत. गाइड शिक्षकाचा पुरस्कार आराई (ता. बागलाण) येथील भारती नवल पवार यांना जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार नागापूर (ता. निफाड) येथील वैशाली प्रभाकर तेलोरे यांना जाहीर झाला आहे.
राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:56 AM