शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

राज्य सरकारने भुजबळांवर केलेल्या अटकेच्या विरोधात समर्थकांचा न्यायालयीन लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 4:09 PM

भुजबळांवर होणा-या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी, असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

ठळक मुद्देअन्याय पे चर्चा : सूडबुद्धीने कारवाई होत असल्याने विरोध भुजबळ समर्थक पुन्हा एकदा लढ्यासाठी सज्ज

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बुधवारी नाशिकचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत न्यायालयीन लढाईसोबतच लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचा समर्थकांच्या चर्चेत सुरू निघाला.सर्वाेच्च न्यायालयाने अडचणीचे कलम थेट रद्द ठरविल्यानंतरही राज्य सरकार ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना जामीन मिळू देत नसून त्यामुळे भुजबळ समर्थक पुन्हा एकदा लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे भुजबळ यांचे एकेकाळचे विरोधक म्हणवले जाणारे राष्टवादी आणि अन्य पक्षातील नेत्यांनीदेखील भुजबळ यांना समर्थन दिले आहे. त्यातच आता अन्याय पे चर्चा उपक्रमाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. माजी खासदार पिंगळे यांच्या निवासस्थानी झालेल्या या अन्याय पे चर्चा उपक्रमात माजी उपमहापौर गुरु मितसिंग बग्गा, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, गोकुळ पिंगळे, अ‍ॅड. संदीप गुळवे, हिरामण खोसकर, डॉ. सयाजीराव गायकवाड, मधुकरराव जेजुरकर, वसंतराव मुळाणे, योगेश कमोद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गुरुमितसिंग बग्गा यांनी, आजवर देशाच्या इतिहासात विरोधी पक्षातील नेत्यांवर कधीही सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही. त्यातही महाराष्ट्रात असा प्रकार घडला नव्हता; मात्र आता छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. सरकारी यंत्रणेला भुजबळांविरोधात कुठलेही ठोस पुरावे मिळत नसल्याने त्यांना सरकारकडून तुरुगात डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा भावना यावेळी बग्गांसह उपस्थितांनी व्यक्त केल्या.

तसेच सध्या देशातील व्यवस्थेच्या विरोधात जो नेता आवाज उठवेल त्याला कुठल्यातरी मार्गाने अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी बाब आहे. तरीदेखील या सर्व प्रकरणातून छगन भुजबळ तावून सुलाखून निर्दोष बाहेर येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच भुजबळांवर होणा-या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी, असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस