शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

प्रवीण पानपाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:21 PM

वणी येथील के.आर.टी. हायस्कूलचे शिक्षक प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्रमासाठी टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

पाथरे : वणी येथील के.आर.टी. हायस्कूलचे शिक्षक प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे या नवोपक्रमासाठी टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र शासन, रवि जय मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) अहमदाबाद, हनी बी व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) सोलापूर यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर राज्यातील सर्व उपक्रमशील शिक्षकांमधून ही निवड केली जाते. सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये हे पारितोषिक वितरण झाले.यावेळी पुणे येथील बालभारतीचे अधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे, पुणे येथील विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालक शोभा खंदारे, अभय दिवाण, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू , एम.के.सी.एल.के.चे कार्यकारी संचालक विवेक सावंत, टी.सी.एम.चे मुख्य शास्त्रज्ञ विपुल शहा, उदय पाचपुते, अरु ण देशपांडे, गुजरात येथील शिक्षणतज्ज्ञ डॉ. भावेश पंड्या, एम.सी.ई.आर.टी. च्या गीतांजली बोरु डे, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवीण पानपाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, दिंडोरी व पेठ तालुका संचालक दत्तात्रय पाटील, मविप्र शिक्षण अधिकारी एस. के. शिंदे, शालेय समिती अध्यक्ष विलासराव कड यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक