नाशिक - महापालिकेच्यावतीने येत्या ९ ते १२ फेबु्रवारी या कालावधीत शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर राज्यस्तरीय महापौर चषक जिम्नॅस्टिक स्पर्धा रंगणार असून तीन प्रकारात होणा-या या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली.महापालिकेच्यावतीने महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, जिम्नॅस्टिक, कुस्ती आणि फुटबॉलचे सामने भरविले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. आर्टिस्टिक, अॅक्रोबॅटिक आणि एरोबिक्स या तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून महाराष्ट्रातून २० संघांमधील सुमारे ८०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आर्टिस्टिक प्रकारात १० वर्षे ते वरिष्ठ गटातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे तर अॅक्रोबॅटिकमध्ये केवळ वरिष्ठ संघांनाच सहभाग नोंदविता येणार आहे. या प्रकारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक संघ सहभागी होईल. दि. ९ फेबु्वारीला सकाळी ११ वाजता संघ नोंदणी होईल. त्यानंतर सायंकाळी पोडियम ट्रेनिंग अर्थात रंगीत तालिम होणार आहे. दि. १० फेबु्रवारीला सकाळी १० वाजता शिवाजी स्टेडियमपासून सहभागी खेळाडूंची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शालिमार, मेनरोड, धुमाळ पॉर्इंट, महात्मा गांधी रोड मार्गे पुन्हा शिवाजी स्टेडियममध्ये मिरवणूक विसर्जित होईल. सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा रंगणार आहे. दि. १२ फेबु्वारीला सायंकाळी ५ वाजता समारोप सोहळा होणार असून यावेळी कामॅनवेल्थमध्ये पदकविजेता खेळाडू आशिषकुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धेसाठी आंतरराष्टय स्तरावरील पंचांनाही निमंत्रित करण्यात आल्याची माहिती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी नाशिक जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सहकार्य लाभत आहे.कुस्ती, फुटबॉल सामने मार्चमध्येसद्यस्थितीत जिम्नॅस्टिक स्पर्धेचेच आयोजन करण्यात येणार आहे. महापौर चषक कुस्ती व फुटबॉल सामन्यांचेही नियोजन करण्यात येत असून मार्चमध्ये हे सामने घेण्याचे प्रस्तावित असल्याचेही सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले. जिम्नॅस्टिक स्पर्धा संयोजनासाठी वेगवेगळ्या समित्यांची रचना करण्यात आलेली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
नाशकात ९ फेब्रुवारीपासून रंगणार राज्यस्तरीय महापौर चषक जिम्नॅस्टिक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:36 PM
महापालिकेचे आयोजन : राज्यभरातून ८०० खेळाडूंचा सहभाग
ठळक मुद्देआर्टिस्टिक, अॅक्रोबॅटिक आणि एरोबिक्स या तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार दि. १० फेबु्रवारीला सकाळी १० वाजता शिवाजी स्टेडियमपासून सहभागी खेळाडूंची मिरवणूक काढण्यात येणार आहे