सिन्नर : राज्यस्तरीय आदर्श समितीदवारे दिला जाणारा ‘आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०१९’ हा सिन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांना नुकताच औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आलाऔरंगाबाद येथे हा पुरस्कार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते निर्मळ यांना प्रदान करण्यात आला. समवेत व्यासपीठावर वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे, आदर्श शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष महेश तांदळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.तालुक्याच्या शैक्षणिक विकासात निर्मळ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून जवळपास तालूक्यातील सर्व शाळा प्रगत झाल्या असून २०५ शाळा डिजटल करण्यासाठी निर्मळ यांचे विशेष योगदान आहे. दोन वर्षात पाच कोटी रूपयांच्या लोकसहभागातून शाळांचा विकास करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेताली आहे. शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यशाळा, चर्चासञे, परिषदा आयोजित करून सुसंवाद निर्माण केला आहे. तसेच तालुक्यातील २७ शाळांनी आयएसओ मानांकन मिळवले असून जवळपास २७ शाळा दप्तरमुक्त शाळा बनल्या आहेत. आँनलाईन कामातही सिन्नर गट राज्यात अग्रेसर आहे, तसेच विविध शिक्षक यांची ब्लॉग व अॅप्स निर्मीती, तंञस्नेहीची राज्यस्तरावर काम करणारी टीम त्यांच्याच कारिकर्दीत तयार झाली आहे. शिक्षणाचीवारी, कृतीसंशोधन, नवोपक्र म यातही सिन्नरने राज्यस्तरावर मजल मारली आहे ते केवळ निर्मळ यांच्या प्रेरणादायी व शिस्तप्रिय कृतीनेच तसेच बंद पडणाऱ्या शाळांना उर्जितअवस्था निर्माण करण्याचे कामही निर्मळ यांनी केले आहे. या सर्व बाबींची दखल घेत निर्मळ यांना राज्यस्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी निमोणीच्या मळ्याचे शिक्षक संदिप लेंडे व विठठल कहाडंळ आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यस्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार सिन्नरच्या निर्मळ यांना प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 5:29 PM