नाशिक : साहित्य क्षेत्रातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने राज्यातील विविध साहित्यकृतींना राजस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
डाॅ विशाल इंगोले यांच्या माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहाला ठाणे येथील रामदास खरे यांच्या आता अटळ आहे या काव्यसंग्रहाला, धुळे येथील प्रेमचंद अहिरराव यांच्या शब्दचित्र या काव्यसंग्रहाला, नांदेड येथील डाॅ योगिनी सातारकर-पांडे यांच्या शब्द जायबंदी होण्याचे दिवस या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील अनुराधा नेरूरकर यांच्या ‘सलणारा सलाम’ या ललित लेखसंग्रहाला जाहीर झाला आहे. जळगाव येथील दीपक तांबोळी यांच्या ‘रंग हळव्या मनाचे’ या कथासंग्रहाला, प्रा. डाॅ. युवराज पवार यांच्या ‘शिकार’ या कथासंग्रहाला, कोल्हापूर येथील डाॅ. श्रीकांत पाटील यांच्या ‘लाॅकडाऊन’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कापडणे (जि. धुळे) येथील रामदास वाघ यांच्या ‘बाहुली माझी लाडकी’ या बालकाव्यसंग्रहाला तर पुणे येथील उर्मिला निनावे यांच्या ‘फुलवाडी’ या बालकाव्यसंग्रहाला, लातूर येथील रसुल पठाण यांच्या ‘निसर्गाशी जुळवू नाते’ या बालकाव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत . पुणे येथील संजय ऐलवाड यांच्या ‘बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा’ या बालकथासंग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डाॅ. मथू सावंत,ॲड विलास मोरे, सावळीराम तिदमे, साहेबराव पाटील, डी बी. महाजन, प्रवीण लोहार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जानेवारीत नियोजित पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.
इन्फो
नाशिकच्या तिघांचा समावेश
या पुरस्कारांमध्ये सूर्योदय काव्यसरिता पुरस्कार नाशिक येथील अभिषेक नासिककर यांच्या समांतर या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे तर कवयित्री गिरिजा कीर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार नाशिकच्या सप्तर्षी माळी यांच्या ‘फिंद्री’ या कथासंग्रहाला, नाशिक येथील राजेंद्र उगले यांच्या ‘थांब ना रे ढगोबा’ या बालकाव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.