नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी विधानसभेत घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़राज्य सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून योग्य ती कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा आमदार जयंत जाधव यांनी दिला आहे़ राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून राज्याच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखला आहे़ या प्रकल्पाबरोबरच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करीत नाही, असा प्रश्नही जाधव यांनी केला आहे़ चितळे समितीने नार-पार खोऱ्यात प्रत्यक्षात ५० टीएमसी पाणी असल्याचा अहवाल दिला आहे़ तर राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणानुसार खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे़ तापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देऊन खोºयातील १९़३८ टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हटले आहे़ असे असताना राज्य सरकारने केवळ १०़५० टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देऊन निधी मंजूर केला़ त्यामुळे उर्वरित पाणी हे नार-पार-तापी खोºयातून गुुजरातला पळविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे़ नार-पार, दमणगंगा-एकदरे खोºयामध्ये १३३ टीएमसी पाणी असून, ते नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य आहे. यासाठी तयार करण्यात येणाºया प्रकल्पांच्या अहवालासाठी सुमारे शंभर कोटींचा खर्च येणार आहे़ या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे), येवला, नांदगाव व चांदवड या तालुक्यांसह जळगाव, धुळे हे जिल्हे तसेच मराठवाड्यालाही पाणी मिळणार आहे़ त्यामुळे सरकारने या सर्व प्रकल्पांचे अहवाल तातडीने तयार करावेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केली़ यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते़
राज्य सरकारचे केंद्रापुढे लोटांगण राजेंद्र जाधव यांचा आरोप : महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:28 AM
नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे