नाशिक : प्रभाग समितीच्या पोटनिवडणुकीत सेनेला एक जागा सोडा किंवा स्थायी समितीत एक जागा वाढवून द्या, अशाप्रकारे दावेदारी सांगत शिवसेनेने भाजपाची कोंडी केली खरी, परंतु पोटनिवडणूक भाजपाने खिशात घातली त्यामुळे त्यांचे पक्षीय तौलनिक बळदेखील वाढल्याने आता स्थायी समितीतदेखील संधी मिळणार नाही, अशी भाजपाची अवस्था आहे. त्यामुळे ‘तेलही गेले, तूपही गेले...’ अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला ६६ जागा मिळाल्या त्यामुळे त्यांचे पक्षीय तौलनिक बळानुसार त्यांचे स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य नियुक्त झाले. परंतु गेल्यावर्षी प्रभाग दहा ड चे भाजपाचे नगरसेवक सुदाम नागरे यांचे निधन झाल्याने भाजपाचे तौलनिक बळ घसरले. त्याची संधी साधून शिवसेनेने आपले अपूर्णांकातील तौलनिक बळ पूर्ण करून समिती एक सेनेचा सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली. स्थायी समितीत त्यामुळे भाजपाचे आठ, तर विरोधकांचे आठ सदस्य होणार होते. लोकसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक लांबली. त्यानंतर आता प्रभाग दहा डच्या पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेने एकतर प्रभाग समितीच्या पोटनिवडणुकीसाठी एक जागा द्या किंवा स्थायी समितीच्या रिक्त जागेवर संधी द्या, अशी मागणी करून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाने याबाबत चतुरीने खेळी करीत प्रभाग दहा डची जागा खिशात घातली तोपर्यंत स्थायी समितीच्या एका सदस्याच्या नियुक्तीची प्रक्रिया लांबविली. आता प्रभाग समितीतील यशामुळे भाजपाचे संख्याबळ पुन्हा वाढले आहे.विरोधात खदखद सुरूशिवसेनेने जेव्हा स्थायी समितीवर दावा सांगितला तेव्हा लोकसभा निवडणुकीपूर्वीची स्थिती होती आणि भाजपाच्या विरोधात खदखद सुरू होती. आता मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर शिवसेनेनेदेखील हा विषय खूप आक्रमकतेने हाताळला नाही.
शिवसेनेची अवस्था... तेलही गेले, तूपही गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:56 AM