शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

रेस्टॉरंट, मंदिरांबाबतचा निर्णय राज्य टास्क फोर्स घेईल : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2021 6:54 PM

जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतु कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा.

ठळक मुद्देबाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. ग्रामीण भागात २४ व शहरी भागातील १३ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती

नाशिक : रेस्टॉरंट, परमिट रूम बिअरबार पूर्ववत सुरू करण्याची तसेच श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता मंदिरे उघडे करण्याबाबत मागणी होत असली तरी, याबाबतचा निर्णय राज्याचा टास्कफोर्स घेईल, स्थानिक पातळीवर याबाबतचे अधिकार नाहीत असा निर्वाळा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देतानाच कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय असल्याचे सांगितले.शनिवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतु कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचीदेखील डेल्टा तपासणी करण्यात येऊन संबंधित रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करावेत.विषाणू कोणताही असो त्यापासून स्वत: सोबत आपल्या कुटुंबाचा व निकटवर्तीयांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणेदेखील गरजेचे आहे. याअनुषंगाने कोरोनाची भीती पूर्णत:संपलेली नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करताना सांगितले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात २४ व शहरी भागातील १३ ठिकाणी अशा एकूण ३७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम ३१ ऑगस्ट अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ.संजय गांगुर्डे, डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यChagan Bhujbalछगन भुजबळ