नांदगाव : इंधनदरवाढीपाठोपाठ खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला असून, केंद्र सरकारने वाढीव दर तातडीने मागे घ्यावे, अशा आशयाची मागणी नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली असून, दरवाढीचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.
१०.२६.२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएपीची गोणी ११८५ रुपयाला होती, ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ ची बॅग ११७५ रुपयांत होती ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशियमच्याही किमती वाढविल्या आहेत. कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची भरमसाठ दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुका अध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
फोटो- १८ नांदगाव राष्ट्रवादी
तहसीलदार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख बाळकाका कळंत्री, बाळासाहेब देहाडराय, सुरेश गायकवाड, भाऊसाहेब सूर्यवंशी, महेंद्र गायकवाड आदींसह कार्यकर्ते
===Photopath===
180521\18nsk_5_18052021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ नांदगाव राष्ट्रवादी तहसीलदार यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख बाळकाका कळंत्री, बाळासाहेब देहाडराय सुरेश गायकवाड, भाऊसाहेब सुर्यवंशी, महेंद्र गायकवाड आदींसह कार्यकर्ते