जानोरी : दिंडोरी तालुक्यातील ओबीसी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार पवार यांना देण्यात आले.महाराष्ट्रभरातून ओबीसी व भटक्या विमुक्त अनुसूचित जमातीच्या वतीने पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजातील जातनिहाय जनगणना व्हावी, शैक्षणिक व नोकरी विषयक आरक्षण बंदी व पदोन्नतवरील निर्बंध ततातडीने हटवावे, सारथीच्या धर्तीवर महाज्योती संस्थेला भरीव निधी व स्वायत्तता मिळावी व ओबीसींच्या हक्काच्या जागेवर होणारे अतिक्रमण तातडीने थांबवावे. या प्रमुख मागण्यानसह एकूण सोळा मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आले.ओबीसी ब्रिगेडच्या वतीने दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार पंकज पवार यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी ओबीसी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष दिलीप पेंढारी, सचिव दत्तात्रेय खैरनार, कुंभार समाजाचे अध्यक्ष सुदाम वैद्य, माळी समाज अध्यक्ष प्रवीण माळी, माळी समाज सचिव सोमनाथ गवळी, नाभिक समाज अध्यक्ष अनिल शिंदे, सुतार समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शांताराम पगार, रामेश क्षीरसागर, बापूराव चव्हाण, रमेश जाधव, मोहन शिंदे आदी उपस्थित होते.