ठळक मुद्दे मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
मनमाड : राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी, यासंदर्भात वंजारी सेवा संघ व समाजबांधवांच्या वतीने येथील मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.यावेळी वंजारी सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश केकान, जिल्हाध्यक्ष निलेश सानप, उपाध्यक्ष संतोष कुटे, किरण देवरे, गणेश हाडपे, रवी सांगळे, अक्षय सांगळे, मधुकर आव्हाड, रमेश इप्पर, लाला नागरे, शंकर केकान, हरिभाऊ बेदाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते.