राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता मागणीसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 06:00 PM2020-07-30T18:00:45+5:302020-07-30T18:00:45+5:30

कसबे सुकेणे : गणेशोत्सवापूर्वी अकरा महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते तरी आपला शब्द पाळून कर्मचाऱ्यांना ही थकबाकी द्यावी अशी मागणी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी केली आहे.

Statement for dearness allowance demand of Class IV employees in the State | राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता मागणीसाठी निवेदन

राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता मागणीसाठी निवेदन

Next
ठळक मुद्देमहागाई भत्याची थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे.

कसबे सुकेणे : गणेशोत्सवापूर्वी अकरा महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते तरी आपला शब्द पाळून कर्मचाऱ्यांना ही थकबाकी द्यावी अशी मागणी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी केली आहे.
केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढीचे राज्यात देखील धोरण आहे. त्यास अनुसरून महागाई भत्ता वाढ राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्त यांना देण्याचा निर्णय शासन घेते. मात्र केंद्र शासनाने महागाई भत्ता मंजूर केल्यानंतरही काही महिने उशीरा राज्य शासन निर्णय घेत असल्यामुळे महागाई भत्याची थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे.
गतवर्षीची जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ११ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकी राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना मिळालेली नाही, ती विनाविलंब मिळावी अशी मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पत्रावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, सरचिटणीस प्रकाश बने, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Statement for dearness allowance demand of Class IV employees in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.