देवळा : वीज वितरण कंपनीने लॉक डाऊन काळात दिलेली अवाजवी बीले कमी करून वीज बीलात ५० टक्के सवलत द्यावी आदी विविध मागण्यांचे निवेदन देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना देण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३ महिने संपूर्ण देशातील व्यवहार, उद्योग ठप्प असल्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काहींच्या वेतनात कपात करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन कालावधीत विज कंपनीच्यावतीने कुठेही ग्राहकांचे विजबील मीटररिडींग घेऊन देण्यात आली नाहीत. ग्राहकांना आता तीन महीन्याचे एकुण बील देण्यात आले आहे. वीज कंपनीने अवास्तव, अंदाजे व चुकीची बिले देवून वीज ग्राहकांची लुट सुरु केलेली आहे.सर्व वीज ग्राहकांना वीज बिलात एप्रिल पासून सहा महिन्यांपर्यंत सरसकट ५० टक्के सवलत द्यावी, लॉकडाऊन काळात रीडिंग न घेता सरासरी वापराचे आधारावर वीज बिल देण्याचे निर्देश नियामक आयोगाने मार्च मध्ये दिले होते. लॉकडाऊन कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला असून सद्या ३० जून पर्यंत तो लागू आहे. त्यामुळे रिडींग उपलब्ध नसलेल्या ग्राहकांसाठी सरासरी बील देण्यात यावे, ज्यांना तीन महीन्याचे एकुण संचित बील दिले आहे, ते रद्द करून त्यांना स्लॅब बेनीफिट देवून नवीन बिले देण्यात यावीत, ज्या ग्राहकांनी यापूर्वी केलेले आॅन लाईन पेमेन्ट वजावट करु नच बीले देण्यात यावीत, लॉकडाऊन काळासाठी बिल देय तारीख तसेच तत्पर भरणा सवलत तारीख यांना मुदत वाढ द्यावी व या काळासाठी विलंब आकार, दंड व व्याज लावू नये व नवीन ५० टक्के देयके माफ करून नवीन वीज बिल देण्यात यावीत,अवास्तव व चुकीची बिले देवून वीज ग्राहकांची लुट व फसवणूक करणाºया अधिकाऱ्यांवर व कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, निंबा आहेर, संजय भदाणे आदी सदस्य उपस्थित होते.
वीज कंपनीविरोधात देवळा ग्राहक पंचायतीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 5:31 PM
देवळा : वीज वितरण कंपनीने लॉक डाऊन काळात दिलेली अवाजवी बीले कमी करून वीज बीलात ५० टक्के सवलत द्यावी आदी विविध मागण्यांचे निवेदन देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना देण्यात आले.
ठळक मुद्देअवास्तव बील :५० टक्के सवलत देण्याची मागणी