निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ''भारत बंद'' आंदोलनमध्ये वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत आहे.
उद्योगपतींच्या हिताचे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे केंद्र सरकारने त्वरित रद्द करावेत, शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे, बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तत्काळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येऊन, शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा महासचिव संजय जगताप, कोषाध्यक्ष शांताराम सोनवणे, जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ, सचिव प्रा. राजेंद्र पवार, सदस्य राजू धिवरे, रवींद्र ढोढरे, योगेश निकम, माजी तालुकाध्यक्ष सुनील आहिरे, कॅम्प विभागप्रमुख दिलीप सोनवणे, सिद्धार्थ उशिरे, आकाश सुरवाडे, संतोष आहिरे, समाधान उशिरे, कैलास लोहार, संतोष बोराळे, शरद पाटील, अरविंद धिवरे, कुणाल आहिरे, सतीश मगरे, आकाश महिरे, गौतम बोरसे यांच्या सह्या होत्या.