दिंडोरी वकील संघातर्फे दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, न्यायालयात कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी, वकील व तेथे काम करणारे टायपिस्ट यांनाही कोरोनाची झळ बसली आहे. सर्व घटक न्यायदानासाठी आपले काम करीत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचे असून, त्यासाठी न्यायालयीन कामकाज करणारे वकील, टायपिस्ट व इतर सर्व घटकांसह त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी दिंडोरी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शांताराम उगले, उपाध्यक्ष ॲड. प्रदीप घोरपडे, सेक्रेटरी ॲड. शिवाजीराव गायकवाड, ॲड. शशिकांत क्षीरसागर, ॲड. जगदीश घुमरे आदी वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
फोटो- ०२ दिंडोरी ॲडव्होकेट
दिंडोरी-सुरगाणा वकील संघाच्या वतीने दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांना निवेदन देताना अध्यक्ष ॲड. शांताराम उगले, ॲड. प्रदीप घोरपडे, ॲड. शिवाजी गायकवाड, ॲड. शशिकांत क्षीरसागर, ॲड. जगदीश घुमरे आदी.
===Photopath===
020621\02nsk_45_02062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०२ दिंडोरी ॲडव्होकेट दिंडोरी-सुरगाणा वकील संघाच्यावतीने दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर यांना निवेदन देताना अध्यक्ष ॲड शांताराम उगले, ड प्रदीप घोरपडे, ॲड शिवाजी गायकवाड, ॲड शशिकांत क्षिरसागर,ॲड जगदीश घुमरे आदी.