इगतपुरी : केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारांसंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदनदेण्यातआले.केंद्रातील सरकारने शेतीमाल व्यापार व्यवस्था सुधारासंबंधी तीन अध्यादेश (दि. ५ जून २०२०) पारित करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपवणे, आॅनलाईन शेतमाल व्यापाराद्वारे एक देश एक बाजार व्यवस्था निर्माण करणे, आवश्यक वस्तू कायद्यातून प्रमुख शेतमाल वगळणे, करार शेतीला प्रत्साहन देणे हे निर्णय शेती व्यवसायाच्या फायद्याचे आहेत. गेली ४० वर्ष शेतकरी संघटनेची ही मागणी होती ती प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाचे आभार मानत असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कृषि क्षेत्राच्या खुलीकरणाच्या दिशेने उचललेले हे पहीले पाउल आम्ही समजतो. यात आणखी सुधारणा करु न शेती व्यवसाय पुर्णपणे निर्बंधमुक्त करावा. शेतीमालाच्या किमती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास संबंधीत शेतीमाल पुन्हा आवश्यक वस्तुंच्या यादीत समाविष्ट करण्याची तरतुद ही व्यापारात अनिश्चितता निर्माण करणारी आहे. तरी शेतीमाल कोणत्याही परिस्थितीत आवश्यक वस्तुंच्या यादीत टाकले जाणार नाहीत याची हमी असणे आपेक्षित आहे.शासनाने घेतलेल्या खुली करणाच्या निर्णयाला विरोध करणारे काही पक्ष व संघटना आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. केंद्र शासनाने या स्वातंत्र्य विरोधी गटांच्या दबावाला बळी न पडता, शेती व्यवसायाच्या खुलीकरणाचा कार्यक्र म असाच पुढे चालू ठेवावा ही अपेक्षा ठेवुन या कामी शेतकरी संघटनेचा शासनाला पाठिंबा राहील. शेती हा राज्य सरकारांच्या आखत्यारितील विषय आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी सरकारने केंद्र सरकारच्या या निर्णयांना मान्यता दिलेली आहेच. पुढील अमलबजावणी त्यांनी त्वरीत करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी झडे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, सचिव अंबादास जाधव, रामदास गायकर, लक्ष्मण मते, रतन म्हसणे, पांडुरंग शेंडे, महेश मालुंजकर, भाऊसाहेब गायकर, ज्ञानेश्वर हंबरे, बाळकृष्ण नाठे, मनोहर सोनवणे, विनायक झाडे आदी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 5:00 PM
इगतपुरी : केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारांसंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदनदेण्यातआले.
ठळक मुद्देकेंद्र शासनाने कृषि क्षेत्राच्या खुलीकरणाच्या दिशेने उचललेले हे पहीले पाउल