सिन्नर : तालुक्यातील दापूर गावातील सर्व शासकीय कार्यालय, व्यावसायिक व इतर पाट्या या मराठीत लावण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले. यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुका पदाधिकाऱ्यांकडूनही काही दिवसांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन याविषयी मागणी केली होती. आता ग्रामीण भागातील कार्यकर्तेही यासाठी पुढाकार घेत असून, दापूरमधील तरुणांनी यासाठी ग्रामपंचायतला निवेदन देत मराठी पाट्या लावण्याचे आवाहन केले आहे. यावेळी विद्यार्थी सेनेचे सूरज आव्हाड, साहिल पठाण, स्वामी उल्हारे, संकेत आव्हाड, आकाश उल्हारे, हेमंत शिरसाठ, सागर मोरे, पंकज शिंदे, साहिल सय्यद, रोशन शिंदे , सागर पवार, तेजस सूर्यवंशी, तोफीक अन्सारी, कार्तिक आव्हाड उपस्थित होते.
मराठी पाट्या लावण्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 11:22 PM
सिन्नर : तालुक्यातील दापूर गावातील सर्व शासकीय कार्यालय, व्यावसायिक व इतर पाट्या या मराठीत लावण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले. यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देमनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी आक्रमक भूमिका