यावेळी आयोजित बैठकीत आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे म्हणाले, आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष गृहभेटी अथवा गटाने अध्यापन करण्याचा पर्याय वापरावा, त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होणार नाही. यासाठी सकारात्मक तोडगा निघणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षकांची वैद्यकीय बिले त्वरित मंजूर व्हावी तसेच चटोपाध्याय लागू झालेले शिक्षक यांना एकस्तर थांबवून भविष्यात वसुली थांबवावी. बदली समायोजन करताना प्रथम स्थानिक आदिवासी कर्मचारी यांना प्राधान्य देणे, आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना एकस्तरचा फरक मिळाला पाहिजे. तसेच शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत करून दुय्यम सेवा पुस्तक अपडेट करणे. जिल्हा बदली होऊन आलेले शिक्षक यांना वेतनश्रेणी देणे, निवड श्रेणी व चटोपाध्याय प्रस्ताव जमा करणे यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्ञानेश्वर भोईर, भावराव बांगर, मारुती कुंदे, देवराम दोबी, राजाराम इदे, संजय गातवे, जनार्दन करवंदे, गणेश घारे, वाळिबा पिचड, पोपट भांगे, मधुकर रोंगटे, भगवान झोले, ज्ञानेश्वर भोईर, गोविंद गिलंदे, गोरख खतेले, नारायण गांजवे, पांडुरंग आंबेकर, एम. टी. लोहकरे, कैलास भवारी, शिवराम मेमाणे, नामदेव धादवड, प्रशांत बांबळे, काशिनाथ भोईर, तुकाराम लांगी, हरिदास साबळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. आदिवासी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.
इगतपुरी
फोटो - २२ इगतपुरी १
इगतपुरी येथे गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देताना आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, ज्ञानेश्वर भोईर, भावराव बांगर, मारुती कुंदे, देवराम दोबी, राजाराम इदे, संजय गातवे, आदी.
===Photopath===
220621\452922nsk_46_22062021_13.jpg
===Caption===
इगतपुरी येथे गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देताना आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, ज्ञानेश्वर भोईर, भावराव बांगर , मारुती कुंदे, देवराम दोबी, राजाराम इदे, संजय गातवे आदी.