आशा व गट प्रवर्तकांच्या कुटुंबांची हमी शासन घेत नाही. कोरोना कामाचा मोबदला केवळ ३३ रुपये रोज देत आहेत. त्यामुळे टेस्टिंगचे काम आशांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक रविवारसहीत दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करतात. त्यांना इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत कायम करावे, अशी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी केली आहे . महाराष्ट्र सरकारने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ही प्रमुख मागणी मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८ हजार व गट प्रवर्तकांना २१ हजार रुपये प्रतिमहा वेतन देण्यात यावे, सर्व नगर पालिकांतील आशा स्वयंसेविकांना पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला द्यावा आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी विजय दराडे, मोहिनी मैंद, मनीषा फड, वैशाली जगताप, छाया लोंढे, उज्ज्वला पगारे, फरीन शहा, रत्ना केदारे, ज्योती आव्हाड, भारती बोडखे, सोनल माळवतकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : १६ मनमाड आशा
मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांना आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या समस्यांबाबत निवेदन देताना विजय दराडे, मोहिनी मैंद, मनीषा फड, वैशाली जगताप, छाया लोंढे आदी.
===Photopath===
160621\16nsk_36_16062021_13.jpg
===Caption===
फोटो : १६ मनमाड आशा मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंढे यांना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या समस्यांबाबत निवेदन देताना विजय दराडे, मोहिनी मैंद, मनिषा फड, वैशाली जगताप, छाया लोंढे आदी.