खर्डे : कोरोनाच्या महामारीने कुठल्याही पिकास भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही सुटत नाही. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच कांद्याला वीस रु पये प्रतिकिलो भाव मिळावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार तथा पिंपळगाव बाजार समिती सभापती दिलीप बनकर यांना देण्यात आले.शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणाºया कांद्याला वीस रु पये प्रतिकिलो हमीभाव मिळावा. आज शेतकऱ्यांचा कांदा ५ ते ६ रु पये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. कांद्याला उत्पादन खर्च १४ ते १५ रु पये येत असताना कांद्याला मिळणाºया अल्पदराने शेतकºयांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कांद्याचे दर वाढल्यानंतर विदेशातून कांदा आयात करून सरकार कांद्याचे दर पाडण्याचे काम करते. कांदा मातीमोल भावाने विकला जात असल्याने उत्पादकांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्यास किमान २० रु पये प्रतिकिलो या दराने हमीभाव मिळाला पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेचे प्रदेश संघटक कृष्णा जाधव, प्रहारचे बापू देवरे, निफाड तालुकाध्यक्ष सनी गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.
कांद्याला प्रतिकिलो वीस रुपये दरासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:06 PM
खर्डे : कोरोनाच्या महामारीने कुठल्याही पिकास भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही सुटत नाही. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच कांद्याला वीस रु पये प्रतिकिलो भाव मिळावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार तथा पिंपळगाव बाजार समिती सभापती दिलीप बनकर यांना देण्यात आले.
ठळक मुद्देआज शेतकऱ्यांचा कांदा ५ ते ६ रु पये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे.