येवला दौऱ्यावर आलेल्या खासदार डॉ. भारती पवार यांना सदर निवेदन देण्यात आले.
सन २०२१ हे संत नामदेव महाराज यांचे ७५१ वे जयंती वर्ष आहे. त्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, पंजाब अशी सर्वदूर फडकवली आहे. तसेच थोर संत ज्ञानेश्वर यांचे ७२५ वे संजीवन समाधी वर्ष आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ, पसायदान हा जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही महान संतांची जयंती शासनस्तरावर साजरी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश लचके, सरचिटणीस पुरुषोत्तम रहाणे, उपाध्यक्ष रामा तूपसाखरे, कार्यवाहक राजेंद्र कल्याणकर, उपकार्यवाह सोमनाथ शिंदे, सहचिटणीस पांडुरंग खंदारे, खजिनदार कवित्व माळवे, संघटक अमोल लचके, सहसंघटक तुषार भांबारे तसेच सचिन शिंदे, प्रमोद लचके, सचिन भांबारे, विपुल सदावर्ते, प्रणव लचके, सुभाष करमासे, सुनील भांबारे, बळीराम शिंदे, अमित हाबडे, अक्षय भांबारे, वरद लचके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - २२ येवला नामदेव
===Photopath===
220521\22nsk_23_22052021_13.jpg
===Caption===
फोटो - २२ येवला नामदेव