सिन्नर : जिल्हा बॅँक व पतसंस्थांच्या वसुलीबाबत काही लोकांनी केलेल्या गैरसमजुतीमुळे सेवकांना कामकाज करताना अडचणी येत आहेत. त्यात प्रशासनाने मदत करावी, यासाठी सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्यावतीने तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले.
प्रशासनाने बॅँका व पतसंस्थाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य कारवाई करून बॅँकांना वसुली करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे. बॅँका व पतसंस्था यांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे जिल्हा कार्यवाह नारायण वाजे, तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अंबादास वाजे, माजी अध्यक्ष कैलास क्षत्रिय, रामनाथ डावरे, संचालक कैलास निरगुडे, ईलाहीबक्ष शेख, मच्छिंद्र चिने, डॉ. प्रतिभा गारे, युनूस शेख, जयंत आव्हाड आदी उपस्थित होते.
फोटो - ०६ सिन्नर पतसंस्था
सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना मागण्यांचे निवेदन देताना पतसंस्था फेडरेशनचे नारायण वाजे, कैलास क्षत्रिय, अंबादास वाजे, कैलास निरगुडे, युनूस शेख, प्रतिभा गारे, रामनाथ डावरे, ईलाहीबक्ष शेख, मच्छिंद्र चिने आदी.
060921\06nsk_17_06092021_13.jpg
सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना मागण्यांचे निवेदन देतांना पतसंस्था फेडरेशनचे नारायण वाजे, कैलास क्षत्रिय, अंबादास वाजे, कैलास निरगुडे, युनूस शेख, प्रतिभा गारे, रामनाथ डावरे, ईलाहीबक्ष शेख, मच्छिंद्र चिने आदि.