ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, परंतु त्यांच्या आधारकार्डची नोंद पुरवठा विभागाने घेऊन त्यांना मागील वर्षी दोन महिन्यांचे धान्य दिले होते. अशा लोकांना एप्रिल ते सप्टेंबर २०२१ पर्यंत मोफत स्वस्त धान्य देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ यासोबत तेल, साखर, दाळ, खोबरे आदी आवश्यक वस्तूही स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात याव्यात, सर्व शिधापत्रिकाधारकांना साखर उपलब्ध करून देण्यात यावी, नवीन शिधापत्रिका देण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, आवश्यक दस्ताऐवजात आधारकार्ड सक्ती करू नये, प्रलंबित अर्ज प्राधान्याने निकाली काढून त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्यात, दलाल, एजंटांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
तहसीलदार प्रमोद हिले यांनी, शिधापत्रिका धारकग्राहकांच्या अडचणी यावेळी समजून घेतल्या. लवकरच स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. चर्चेत संस्थेचे अध्यक्ष अजहर शाह, शहर काजी सलीमोद्दीन यांनी सहभाग घेतला. निवेदनावर अजहर शाह, नदीम अन्सारी, फारूक अन्सारी, दिलशाद अन्सारी, खालिद अन्सारी, तासदीक शेख, शाकिर शेख, सलीम काजी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
फोटो - २७ येवला २
येवला येथे स्वस्त धान्य दुकानांबाबत तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना अजहर शाह, शहर काजी सलीमोद्दीन आदी.
===Photopath===
270521\144827nsk_24_27052021_13.jpg
===Caption===
येवला येथे स्वस्त धान्य दुकानांबाबत तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना अजहर शाह, शहर काजी सलीमोद्दीन आदी.