वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे जवळील एका कंपनीत चार दिवसांपूर्वी पत्रा तूटून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच या प्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तहसीलदार यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की वाडीवऱ्हे एम. आय. डी. सी. मध्ये चार दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील फैब कंपनीमध्ये उंचावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कामगारांना सुरक्षा विषयक साहित्य पुरवले नसल्याने अशाप्रकारचे अपघात घडत असतात. त्यामुळे कंपनी प्रशासनाचे कामगार संरक्षणाकडे दुर्लक्ष झालेले आहे, हे यावरून दिसून येत आहे. यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या कंपनीमध्ये अती जोखमीचे व अवजड लोखंडी काम असून कामगारांना कोणतेही सुरक्षा किंवा सुरक्षाविषयक साहित्य दिले जात नाही. या अगोदरपण या कारखान्यात छोटे मोठे अपघात झाले आहेत. येथील कामगार जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे या व इतर कामगारांचा विमा उतरविला आहे का? कामगार कायद्यानुसार कामगारांना सर्व सुविधा पुरविल्या जातात का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मंगळवारी (दि.१५) ईगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले आहे. या अपघाताची सखोल चौकशी करावी व मृत कामगारांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते व विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यानी वाडीवऱ्हे गोंदे एमआयडीसीतील कामगारांची कैफियत तहसीलदार यांना भेटून मांडली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मृत कामगारांच्या न्यायासाठी मनसेचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 12:01 AM
वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे जवळील एका कंपनीत चार दिवसांपूर्वी पत्रा तूटून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच या प्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तहसीलदार यांना दिले आहे.
ठळक मुद्देकामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर