घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे कोरोनामुळे निधन झाले. या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रु पये खर्च झाले असून, उपचाराकरिता नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करीत विविध मागण्यांचे निवेदन इगतपुरी तहसीलदारांना देण्यात आल आहे.शासनाकाडून मिळणारे कमीशन हे तुटपुंजे असून, दुकानदारांचे उपजीविकेचे साधन दुकान हेच आहे. परंतु त्यानंतरही प्रपंच चालत नाही आणि आता ही कोरोनाच्या महामारीमुळे आजही तालुक्यात अनेक दुकानदार कोरोनावर उपचार घेत आहेत. यासाठी तालुका दुकानदार संघटनेच्या वतीने कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांचा उपचारासाठी जो पैसा खर्च झाला त्या बदल्यात शासनाने अर्थसहाय्य करावे व आतापर्यंत कोरोनाने आपला जीव गमावलेल्या दुकानदार व सर्वच दुकानदारांना विमा कवच द्यावे या मागणीचे निवेदन इगतपुरी तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले. देशात कोरोनाची महामारी सुरू असताना तालुक्यातील सर्व दुकानदार आजपर्यंत शासनाचे सर्व नियम सांभाळून दुकाने चालवित आहेत. यापूर्वी जिल्हा संघटनेच्या वतीने दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन मागण्या केलेल्या आहेत. दुकानदार आजारी पडल्यास आॅफलाइन पद्धतीने धान्य वाटपाची मंजुरी द्यावी, अशा मागण्या निवेदनात नमूद केल्या असून, या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास इगतपुरी तालुक्यातील दुकानदार आॅक्टोबर महिन्याचे धान्य उचलून वाटप करणार नसल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शशी उबाळे, अरु ण भागडे, तात्या पाटील भागडे, संजय गोवर्धने, गौतम पंडित, बबलू गटकळ, गुलाब वाजे, शिवाजी पोरजे, गोविंद धादवड, बाळासाहेब घोरपडे, राजेंद्रसिंह परदेशी आदी रेशन दुकानदार उपस्थित होते.
रेशन दुकानदार संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 6:47 PM
घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे कोरोनामुळे निधन झाले. या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रु पये खर्च झाले असून, उपचाराकरिता नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करीत विविध मागण्यांचे निवेदन इगतपुरी तहसीलदारांना देण्यात आल आहे.
ठळक मुद्देघोटी : तीन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू; आर्थिक सहाय्याची मागणी