बेरोजगारीबाबत युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:43 PM2020-09-09T22:43:24+5:302020-09-10T01:13:33+5:30
निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले.

वर्षाला 2 कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी भाजपाने दिले होते. मात्र नोट बंदीमुळे कृषी, सुक्ष्म व लघु उद्योगाला फटका बसला. त्यामुळे करोडोच्या संख्येने रोजगार बुडाला. देशातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. कोरोना काळात याची झळ ग्रामीण भागा बरोबरच शहरातील युवकांना बसली आहे. बेरोजगारांच्या प्रश्नावर केंद्र सरकार कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे देशातील युवक हताश झालेला आहे. युवकांना तातडीने रोजगार मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, निफाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, सुनील निकाळे, तालुका सरचिटणीस सुहास सुरळीकर, नगरसेवक दिलीप कापसे, आतिष गायकवाड, राजेश लोखंडे,तौसिफ राजे, राहुल नागरे, राहुल पवार, सूरज साळवे, राहुल पवार, आकाश जगताप आदी उपस्थित होते.