वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा गावात कोरनायोद्धा म्हणून सेवा बजावणार्या अशा सेवकांनी विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक देत जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले तुटपुंजा मानधनावर कसे काम करणार शासन प्रशासनाने अशा सेविकांच्या विचार करत मानधन किमान 5000 करावे सर्व अशा सेविकांना 50 लाखाचे विमा कवच मिळावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात काम करण्याची सुरिक्षत कीट मिळावे सेवा कालावधीत कायम करावे आधी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्याप्रसंगी सुवर्णा देशमुख, कविता लिलके, सविता भागवत, नंदाबाई भगरे, ज्योती वाघले, सविता गांगुर्डे, वंदना लिलके, पुनम राजगुरू, उषा वडजे, पुनम आहेर, सुरेखा गांगुर्डे, अलका वटाणे, अर्चना तुपलोंढे, पूजा चौरे, अनिता पांडव आदी उपस्थित होते.