वीज वितरण कंपनीकडून चालू असलेल्या सक्तीच्या वसुली थांबवावी, थकीत वीज बिल तीन टप्प्यात स्वीकारावे अशी विनंती महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
येवला मर्चंट बँक चेअरमन अरुण काळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात, बँकेने व्यापारी वर्गासाठी कर्ज पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा, वीस हजारापर्यंत विनातारण कर्ज छोट्या व्यावसायिकांना उपलब्ध करून द्यावे, आगामी निवडणुकीमध्ये बँकेच्या सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संचालक धनंजय कुलकर्णी, मनीष काबरा, व्यवस्थापक अरविंद जोशी उपस्थित होते.
येवले नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात, कोरोनामुळे व्यवसाय बंद राहिल्या कारणाने सहा महिन्याचे नगरपालिकेचे गाळेधारक व्यापारी व सर्वसामान्य जनता यांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी करण्यात आली. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्यापारी महासंघाने चर्चा केली असता नगरपालिकेने तसा ठराव करून आमच्याकडे पाठवावा आम्ही त्यावर विचार करू असे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी व नगरसेवक उपस्थित होते.
येवला मर्चंट बँकेच्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा ही मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवावी म्हणून यासंदर्भातील निवेदन येवला सहायक निबंधक एकनाथ पाटील यांना देण्यात आले. निवेदनावर अध्यक्ष योगेश सोनवणे, अविनाश कुक्कर, सुमित थोरात, सुभाष गांगुर्डे, अतुल घटे, सचिन सोनवणे, दीपक नाशिककर आदींसह व्यापारी महासंघ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.