कसबे-सुकेणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवा पद्धतीने भरती न करता बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी भरती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ नाशिक व धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.३०) पासून काळ्या फिती लावून काम सुरू केल्याची माहिती राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.राज्यभर दुपारच्या सुट्टीत मुंबईतील ५ आणि उर्वरीत महाराष्ट्रातील १४ रु ग्णालयांबाहेर तीव्र निदर्शने देखील करण्यात आली. यात १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले.जे. जे. रु ग्णालयातील ९ संघटना मिळून निर्माण केलेल्या कृति समितीचाही त्यात सहभाग होता. हे आंदोलन २ जुलैपर्यंत असेल. त्यानंतर दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आपला निषेध आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवला जाणार आहे.२ जुलैपर्यंतच्या आंदोलनानंतरही दखल घेतली नाही तर ३ ते ५ जुलै दररोज दोन तास काम बंद आंदोलन केले जाईल. त्यानंतर ७ जुलैला संपूर्ण दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. आजच्या या आंदोलनानंतरही अद्याप शासनाने त्याची दखल घेतली नाही, संघटनेचा चर्चेसाठी निमंत्रित केले नाही, त्याबद्दल कर्मचाºयांच्या मनात असंतोष असल्याचे पठाण यांनी सांगितले.
शासनाने अध्यादेशाद्वारे गट १ ते ३ पर्यंतची पदे सरळ सेवा भरतीने करायचा निर्णय घेतला आहे. फक्त गट ४ साठी कंत्राटीपद्धतीने भरती होणार आहे. ही ३६३२ पदं असून त्यात सध्याचे १९८१ वर्षांपासूनचे ९२२ बदली कामगार तसेच आरोग्य आस्थापनावरील राजीव गांधी जीवनदायी योजनेतील कामगारांना कायम करणे किंवा प्रलंबित असलेले वारसाहक्क व अनुकंपा तत्वावरील पदे यांचा कुठलाही समावेश नाही. याबाबत वर्षानुवर्षे पाठपुरावा करत असूनही काहीच कार्यवाही केलेली नाही.