शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिडको महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:51 AM

सिडको : उत्तमनगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१९) या युवकाने शनिवारी (दि. ८) राहत्या घरात गळफास ...

सिडको : उत्तमनगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१९) या युवकाने शनिवारी (दि. ८) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मयत विक्रांत याने लिहिलेल्या चिठ्ठीत महाविद्यालयातील प्राध्यापक जबाबदार असल्याचा आरोप केला असल्याने संबंधित प्राध्यापकास निलंबित करून कारवाई करावी या मागणीसाठी आज महाविद्यालयाच्या आवारात परिसरातील नागरिक व महाविद्यालयातील युवकांनी ठिय्या आंदोलन केले. यानंतर संचालक व शिक्षणाधिकाºयांनी संबंधित प्राध्यापकाचे निलंबन करण्यात येत असल्याचे लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  सिडकोतील वावरे विद्यालयात एस.वाय.बी.कॉम.चे शिक्षण घेणाºया विक्र ांत चंद्रभान काळे या विद्यार्थ्याने गेल्या शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विक्रांत याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली.विक्रांत याने महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. एस. एस. पाटील यांनी नापास केले असून, पेपर दाखविण्यास तयार नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापकावर गुन्हा दाखल करून महाविद्यालयातून निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आज सकाळी विक्रांत याचे नातेवाईक, मित्र तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन विक्रांत याच्या घरापासून महाविद्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी विक्रांतला न्याय द्यावा, पाटील यांना निलंबित करावे अशी मागणी करणारे फलक हातात घेऊन महाविद्यालयात दाखल झाले. गर्दीचा विचार करता अंबड पोलिसांनी महाविद्यालयात केवळ नातेवाइकांचाच प्रवेश दिला. त्यानंतर संस्थेचे संचालक नाना महाले यांनी याबाबत चर्चा करून संबंधित प्राध्यापकावर कारवाई करण्यासाठी एक समित नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र नातेवाईक व आंदोलनकर्त्याचा यास तीव्र विरोध असल्याने निलंबन करा मगच आंदोलन थांबवू असे सांगून महाविद्यालयाच्या आवारात व रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे, संतोष सोनपसारे, संजय भामरे, रमेश उघडे, शरद काळे, भूषण राणे, योगेश बेलदार, शंकर पांगरे, बाळा दराडे, बाळासाहेब गिते, गोविंद घुगे, शिवाजी बरके, डॉ. संदीप मंडलेचा, सुनील जगताप, विशाल डोके, संदीप दराडे, सागर नागरे, नंदेश ढोले, गणेश सांब्रे, गौतम पराडे यांच्यासह युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.पाटील यांना निलंबन करण्याचा निर्णयपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून याठिकाणी संस्थेचे शिक्षणाधिकारी, संचालक महाले, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी दत्ता पाटील, बाळासाहेब सोनवणे यांनी विचार करून याबाबत मविप्रचे सरचिटणीस नीलिमा पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकाराचे गांभीर्य विचारात घेऊन संबंधित पाटील यांना निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सदरचे पत्र तयार करून त्या पत्राची एक प्रत विक्र ांत याच्या आईला देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी मयत विक्र ांत यास श्रद्धांजली अर्पण करून आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी